पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती नियंत्रणात, जाणून घ्या आज काय आहेत दर

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर ११० डॉलर प्रती बॅरल पोहोचूनही इंधन वितरण कंपन्यांनी आज, १६ मे रोजी पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. भारतीय बाजारपेठेत ७ एप्रिलपासून इंधन दर स्थिर आहेत. त्यामुळे महागाईच्या तडाख्याने त्रस्त झालेल्या जनतेला थोडा दिलासा मिळाला आहे.

इंडियन ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी नेहमीप्रमाणे आज, १६ मे २०२२ रोजी सकाळी सहा वाजता इंधन दर अपडेट केले आहेत. त्यानुसार, देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल १०५.४१ रुपये तर डिझेल ९६.६७ रुपये प्रती लिटरवर स्थिर आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे १२०.५१ आणि १०४.७७ रुपये प्रती लिटर दराने विक्री केले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल ११५.१२ रुपये आणि डिझेल ९९.८३ रुपये प्रती लिटर आहे. तर चेन्नईत पेट्रोल, डिझेल अनुक्रमे ११०.८५ आणि १००.९४ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे. नोएडामध्ये पेट्रोल १०५.४७ तर डिझेल ९७.०३ रुपये प्रती लिटर आहे. लखनौमध्ये १०५.२५ रुपये दराने पेट्रोल तर ९६.८३ रुपये प्रती लिटर दराने डिझेल मिळत आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल ९१.४५ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ८५.८३ रुपये प्रती लिटरने मिळत आहे.

राज्यस्तरावर व्हॅटच्या आकारणीचे दर वेगवेगळे असल्याने शहरांनिहाय दरात फरक पडतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलच्या किमतीच्या आधारावर पेट्रोल आणि डिझेलचे दररोज दर निश्चित केले जातात. पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलतात. सकाळी सहा वाजता ते अपडेट केले जातात. पेट्रोल डिझेलचे नवे दर तुम्ही SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP यासोबत आपल्या शहराचा कोड नंबर लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर एसएमएस करू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here