बिद्री साखर कारखान्याचा डिस्टीलरी प्रकल्प ठप्प झाल्यामुळे सभासदांत अस्वस्थता

कोल्हापूर :बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी कारखान्याच्या सुमारे १३० कोटी रुपये खर्चाच्या डिस्टीलरी प्रकल्पावर राज्य उत्पादक शुल्क पथकाने कारवाई करून हा प्रकल्प निलंबित केला. कारखान्याने अटी व शर्ती यांचे पालन न करता प्रकल्यातून बेकायदेशीर उत्पादन व विक्री केली आहे असा शेरा मारत उत्पादन शुल्क विभागाने डिस्टीलरी प्रकल्प सील केला आहे.उत्पादित सुमारे १० लाख लिटर स्पिरीटही जप्त केले आहे.चौकशी अहवालामध्ये कारखाना प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढून १२ कोटींहून अधिक शासकीय महसूल बुडविण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे. या कारवाईमुळे कारखाना डिस्टीलरी प्रकल्पाचे काम ठप्प झाले आहे.चाचणी अपूर्णच राहिली आहे.

कारखान्यावरील कारवाईबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी उपाध्यक्ष ए.वाय.पाटील, माजी आ. दिनकरराव जाधव, माजी आ.संजय घाटगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, प्रवीणसिंह पाटील यांनी निषेध व्यक्त केला आहे.याबाबत आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.यामागे राधानगरी- भुदरगडच्या विधानसभा निवडणुकीची राजकीय किनार असल्याचे बोलले जाते.दरम्यान, प्रकल्प बंद पाडण्यात आल्याने कार्यक्षेत्रातील सभासदांत अस्वस्थता आहे.प्रकल्प उभारताना प्रथम लोकअदालत घेत ना हरकती घ्याव्या लागल्या.पण, प्रदूषणाचा मुद्दा पुढे आला.यावर कारखाना प्रशासनाने मोठी लढाई लढली. परवान्यांसाठी मोठी कसरत केली.या सर्वाला राजकीय किनार असली तरी कारखाना मात्र त्यात भरडला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here