साखरेच्या किमतीत अनपेक्षित वाढ

नवी दिल्ली चीनी मंडी

साखरेच्या किमतीत अनपेक्षित वाढ झाली आहे. काल (सोमवार, २४ सप्टेंबर) पासून साखरेच्या दरात प्रति क्विंटल ६० ते ७० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांतील साखरेचा हा उच्चांकी दर आहे. साखर कारखान्यांनी सप्टेंबरचा विक्री कोटा पूर्ण होण्याची जणू आशाच सोडली होती. पण, अचानक साखरेचा दर वाढल्याने साखर उद्योगात चैतन्याचे वातावरण आहे. कारखान्याचा चालू महीन्याचा मंथली कोटा बऱ्या पैकी संपत आल्या मुळॆ बजारात तेजी चॆ वतावरण निर्माण झालॆ आहे. साखरेच्या निर्यातीचे मार्ग खुले करण्याचा तसेच कारखान्यांना बेल आऊट पॅकेज देण्याच्या तयारीत असलेल्या सरकारसाठीही आनंदाची बातमी आहे.

सरकारकडून काही आशादायक निर्णय घेतला जाईल, या अपेक्षेनेच बाजारातून ही अचानक दरवाढ झाल्याचे मानले जात आहे. साखर कारखान्यांना सध्या दिलेल्या कोट्याची साखर निर्यात करणे अवघड झाले आहे. जागतिक बाजारातील घसरलेल्या किमती आणि फेब्रुवारी, मार्चमध्ये साखरेच्या साठ्याबाबत मागे घेण्यात आलेला निर्णय यांमुळे कारखाने अडचणीत आले होते.

स्थानिक बाजारपेठेत साखरेच्या दरांची वाढ झाली असली, तरी आंतरराष्ट्रीय बाजारात दर स्थीर आहेत. मात्र, सरकराने साखरेचा निर्यात कोटा जाहीर करण्यास उशीर केला, तर आंतरराष्ट्रीय बाजारातून फारशा आशा ठेवता येणार नसल्याचे बोलले जात आहे. साखर उद्योगाला अजूनही वाहतूक अनुदानाची अपेक्षा आहे. सागरी किनारपट्टीतील कारखान्यांना २५० रुपये प्राति क्विंन्टल तर देशांतर्गत ३00  रुपये प्राति क्विंन्टल अनुदान मिळेल, अशी आशा साखर उद्योगाला आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here