खरीप हंगामाकरिता फॉस्फेटयुक्त आणि पोटॅशयुक्त (P&K) खतांसाठी पोषक तत्वांवर आधारित अनुदान (एनबीएस) दरांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज खरीप हंगाम – 2022 करिता (01.04.2022 ते 30.09.2022 पर्यंत) फॉस्फेटयुक्त आणि पोटॅशयुक्त (P&K) खतांसाठी पोषक तत्वांवर आधारित अनुदानाच्या (NBS) दरांसाठी खत विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

आर्थिक परिणाम:

एनबीएस खरीप-2022 साठी (01.04.2022 ते 30.09.2022 पर्यंत) केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेले अनुदान. 60,939.23 कोटी रुपये असून त्यात मालवाहतूक अनुदानाद्वारे स्वदेशी खतासाठी (SSP) समर्थन आणि स्वदेशी उत्पादन आणि डाय-अमोनियम फॉस्फेटच्या आयातीसाठी अतिरिक्त समर्थन यांचा समावेश आहे.

फायदे:

डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) आणि त्याच्या कच्च्या मालाच्या आंतरराष्ट्रीय किमतीत झालेल्या वाढीचा भार प्रामुख्याने केंद्र सरकारने उचलला आहे. डाय-अमोनियम फॉस्फेटवरील सध्याच्या 1650 रुपये प्रति बॅग अनुदानाऐवजी 2501 रुपये प्रति बॅग अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे जे गेल्या वर्षीच्या अनुदान दरांपेक्षा 50% वाढले आहे. डाय-अमोनियम फॉस्फेट आणि त्याच्या कच्च्या मालाच्या किमतीमधील वाढ अंदाजे 80% आहे. हे शेतकऱ्यांना अनुदानित, परवडणाऱ्या आणि वाजवी दरांवर अधिसूचित फॉस्फेट आणि पोटॅश युक्त खते मिळण्यास मदत करेल आणि कृषी क्षेत्राला मदत करेल.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here