केंद्रीय मंत्री रामदास आठवले कोरोनाग्रस्त, रुग्णालयात दाखल

रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. रामदास आठवले यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी रामदास आठवले यांनी पायल घोष यांना आरपीआई ची सदस्यता दिली होती, त्यानंतरच त्यांना अंगदुखी आणि कफाचा त्रास होवू लागला, ज्यानंतर त्यांनी आपली कोरोना टेस्ट केली. या टेस्ट मध्ये आठवले पॉजिटिव्ह आढळले.

आता पायल घोष यांच्या क्वारंटाइन होण्या न होण्याबाबत चर्चा सुरु आहे. पक्षाने त्यांना वुमेन विंग चा वाइस प्रेसिडेंट बनवले आहे.

या कार्यक्रमामध्ये रामदास आठवले यांनी सांगितले होते की, आरपीआई आंबेडकर यांचा पक्ष आहे. यामध्ये प्रत्येक वर्गातील लोंकांची मदत केली जाते. मग तो दलित असो, आदिवासी असो,ओबीसी असो, गाव किंवा झोपडीत राहणारा असो. रामदास आठवले त्यांना म्हणाले की, जर आपण पक्षात आलात तर पक्षाला एक चांगला मजबूत चेहरा मिळेल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here