दिल्लीत ३१ मेपासून अनलॉक सुरू, कारखान्यांसह बांधकाम क्षेत्राला प्राधान्य

79

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ३१ मे पासून नियोजनबद्ध पद्धतीने अनलॉक सुरू करण्यात येत असल्याची माहिती शुक्रवारी दिली. सर्वात पहिल्यांदा बांधकाम आणि कारखाने सुरू करण्यात येणार आहेत.

केजरीवाल यांनी सांगितले की, दिल्लीत कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने घटक आहे. गेल्या २४ तासात संक्रमणाचा दर १.५ टक्के आहे तर कोरोनाचे नवे ११०० रुग्ण आहेत. त्यामुळे सोमवारपासून बांधकाम क्षेत्र आणि कारखाने सुरू केले जातील. सध्याचा लॉकडाउन सोमवारी सकाळी पाच वाजता संपेल. त्यानंतर आम्ही अनलॉक प्रक्रिया सुरू करीत आहोत. कामगारांचे हित लक्षात घेऊन सोमवारपासून ही कामे सुरू केली जातील.
केजरीवाल म्हणाले, कोविड १९ची रुग्णसंख्या घटत असल्याने दिल्ली अनलॉकच्या प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी दिल्ली आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाची (डीडीएमए) बैठक उपराज्यपाल अनिल बैजल यांच्यासोबत होणार आहे. त्यात सर्व सहमतीने निर्णय होईल. आम्ही दर आठवड्याला हळूहळू सर्व लॉकडाउन उघडणार आहोत, असे ते म्हणाले.

शनिवारी दिल्लीत कोरोनाचे नवे २२६० रुग्ण सापडले तर संक्रमणाचा दर ३.५८ टक्के होता. दिल्लीत संक्रमणाचे १०७२ नवे रुग्ण असून संक्रमण दर १.५३ टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here