अवकाळी पावसाने पिके बुडाली, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

भरगामा : अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे विभागातील भात उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता पाऊस थांबल्यानंतर शेतकरी शेतात कापून ठेवलेले पीक पाण्यात बुडण्यापासून वाचविण्याच्या प्रयत्नात आहेत. कापून ठेवलेले भात उन्हात वाळविण्यासाठी ते अथक प्रयत्न करीत आहेत. मात्र, अद्यापही प्रखंड विभागात हजारो एकर क्षेत्रातील भात पिक पाण्यात बुडालेले आहे. सरकारी स्तरावरुन अद्याप सर्व्हे सुरू करण्यात आला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

रामपूर येथील शेतकरी दिलीप सिंह, बंटी सिंह, पॅकपास येथील बैजू मंडल आदींनी सांगितले की, यावर्षी चांगला पावसाळा झाल्याने चांगल्या पिकाची अपेक्षा होती. मात्र, निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी दिवसरात्र एक करून पिकवलेली शेते पाण्यात बुडाली आहेत. शेतांमध्ये सध्या कापणी, मळणीची कामे सुरू होती. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रयत्नांवर हे पाणी पले आहे. पाण्यात बुडालेल्या भाताला कोंब फुटू लागले असून हे खराब होऊ लागले आहे. पिकांचे सुमारे ६० टक्के नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कुशमौल गावचे शेतकरी नुनूलाल यादव यांनी सांगितले की, शेतातील पाणी लवकर ओसरले नाही तर पिक कुजण्याचा धोका आहे. शंकरपूरचे शेतकरी मो. सद्दाम, आशिष सिंह यांनी सांगितले की जोरदार पावसाने शेतात पाणी साठले आहे. कृषी अधिकारी राजेश्वर प्रसाद यांनी नुकसानीच्या सर्व्हेचे आदेश देण्यात आले असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here