सहारनपूर : सहकारी समित्यांच्या निवडणुकीनंतर आता ऊस विकास समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. समिती सदस्यांची पडताळणी गतीने केली जात असून १० एप्रिल रोजी अंतरिम मतदार यादी प्रकाशित केली जाईल. जिल्ह्यातील सहा ऊस समित्यांमध्ये १,९८१ प्रतिनिधी निवडले जाणार आहेत. ग्रामीण राजकारणात ऊस विकास समित्यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे विविध राजकीय पक्षांचे नेते यावर लक्ष ठेवून असतात. जिल्ह्यात चार ऊस विकास समित्या आणि दोन साखर कारखान्यांच्या समित्या आहेत. साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करणारे सदस्यच यासाठी मतदार म्हणून भूमिका निभावतात. हे मतदार प्रतिनिधींची निवड करतात. प्रतिनिधी समिती संचालक निवड करते. आणि संचालकांकडून सभापती तथा उपसभापतींची निवड होते.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यात सहा ऊस विकास समित्यांमध्ये २,२२,१७७ सदस्य आहेत. त्यांच्या नावांच्या पडताळणीचे काम अद्याप सुरू आहे. १० एप्रिल रोजी जाहीर होणाऱ्या अंतरिम मतदार यादीवर ११ एप्रिल रोजी आक्षेप नोंदवले जाऊ शकतात. १२ एप्रिल रोजी छाननी करून अंतिम मतदार यादी प्रकाशित होईल. १३ एप्रिल रोजी प्रतिनिधी निवडीसाठी अर्ज दाखल करुन घेतले जातील. २१ एप्रिल रोजी मतदान होईल. संचालक निवडीसाठी २ मे रोजी अर्ज दाखल केले जातील. आणि ११ मे रोजी मतदान होईल. सभापती, उप सभापतींची निवड १२ मे रोजी होईल, अशी माहिती जिल्हा ऊस अधिकारी सुशील कुमार यांनी दिली.