यूपी विधानसभा निवडणूक : साखर कारखाना सुरू करण्याची काँग्रेस उमेदवाराची घोषणा

मेरठ : काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अभिनेत्री अर्चना गौतम यांना मेरठमधील हस्तीनापूर येथून उमेदवारी दिली आहे. अर्चना नोव्हेंबर २०२१ मध्ये काँग्रेस पक्षात सहभागी झाल्या होत्या. त्यापूर्वी प्रियंका गांधी -वड्रा यांनी पक्षाकडून आगामी निवडणुकीत ४० टक्के महिलांना उमेदवारी दिली जाईल अशी घोषणा करण्यात आली होती.

काँग्रेसने अर्चनासह समाजातील विविध स्तरातील महिलांना उमेदवारी दिली आहे. अ्चना गौतम यांनी सांगितले की, त्या शेतकऱ्यांसाठी येथे कार्यरत राहतील. येथे केवळ एकच साखर कारखाना आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचावा यासाठी आणखी एक साखर कारखाना मी सुरू करणार आहे.

१० फेब्रुवारीपासून सात टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने गुरुवारी १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत ५० महिला उमेदवारांचा समावेश आहे. एएनआयशी बोलताना गौतम यांनी सांगितले की, जर त्या हस्तीनापूरची निवडणूक जिंकल्या तर विकासकामांवर अधिक लक्ष केंद्रीत करतील. पर्यटनालाही येथे प्रोत्साहन दिले जाईल.

हस्तीनापूर हे पर्यटन स्थळ आहे. येथे खूप प्राचीन मंदिरे आहेत. मात्र, कनेक्टिव्हिटी नसल्याने येथे लोक येत नाहीत.

आमदार झाल्यानंतर बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन निर्मिती याला माझे प्राधान्य असेल. जर पर्यटनाला प्रोत्साहन दिले तर पर्यटक येतील आणि रोजगारही वाढेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here