युपी: ऐरा साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट, दोघे जखमी

खमरिया/ओयल : ऐरा येथील गोविंद शुगर मिळमध्ये शुक्रवारी रात्री बॉयलर फुटून झालेल्या अपघातात दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले. गंभीर अवस्थेत त्यांना जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तेथील प्राथमिक उपचारानंतर लखनौत अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले. या घटनेनंतर कारखाना १२ तासांसाठी बंद करण्यात आला.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कारखाना सुरू असताना रात्री आठच्या सुमारास अधिक दाब निर्माण झाल्याने बॉयलरचा स्फोट झाला. स्टीम पाइप फुटल्याने उकळते पाणी सर्वत्र पसरले. त्यामुळे तेथील कर्मचारी बबलू रॉय आणि राकेश हे दोघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्य अधिकारी प्रीतम पाल सिंह व युनिट हेड आलोक सक्सेना घटनास्थळी पोहोचले. बॉयलर फुटून हा अपघात झाला आहे. दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती युनिट हेड आलोक सक्सेना यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here