युपी : ऊसाला प्रती क्विंटल ४५० रुपये दर देण्याची मागणी

सहारनपूर : भारतीय किसान युनियनच्या तोमर गटाने पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या गहू, मोहरीसारख्या पिकांना सरकारने योग्य भरपाई देण्याची मागणी केली. यासोबतच विविध समस्यांबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यामध्ये उसाला प्रती क्विंटल ४५० रुपये दर देण्याची मागणी करण्यात आली आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, भाकियूच्या तोमर गटाने सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या पाच वर्षात पेट्रोल-डिझेलच्या दरात गतीने वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च दुप्पट झाला आहे. त्यामुळे ऊसाचा दर ४५० रुपये प्रती क्विंटल करण्याची गरज आहे. गोपाली ते राजूपुर ते दुगचाडी रस्त्याचे काम गतीने करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. हाजी अब्बास यांच्या नेतृ्त्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी डॉ. पंजाब सिंह, खलील प्रधान, इलियास, फरमान अली, आजाद सिंह, हुसेन अहमद, अथर नकवी, डॉ. रमीज, तमरेज, महक सिंह, अहतेशाम, आजम गौड आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here