युपी निवडणूक : ऊस थकबाकी १५ दिवसांत देण्याची अखिलेश यादव यांचे आश्वासन

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता गती आली आहे. सर्व राजकीय पक्ष ऊस थकबाकीचा मुद्दा उचलण्याचा प्रयत्न करीत आहेत. समाजवादी पक्षही शेतकऱ्यांचे मुद्दे घेऊन मैदानात उतरला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शेतकऱ्यांच्या प्रत्येक पिकासाठी एमएसपी, मोफत सिंचन सुविधा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १५ दिवसांत ऊस थकबाकी, व्याजमुक्त कर्ज आणि विमा, पेन्शनसारखी अनेक आश्वासने दिली आहेत.

यादव यांनी रद्द करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलनावेळी शेतकऱ्यांच्या विरोधात दाखल केलेले खटले मागे घेणार आणि आंदोलनावेळी मृत्यूमुखी पडलेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटु्ंबांना २५-२५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. अखिलेश यादव म्हणाले की, ही सर्व आश्वासने राज्यातील विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या जाहिरानाम्याचा भाग असतील. समाजवादी पक्षाने आधीच सर्वांना ३०० युनिट विज देण्याचे आश्वासन दिले आहे.

ऊस बिले हा प्रत्येक निवडणुकीत एक मुख्य मुद्दा बनतो. या मुद्यावर राजकीय पक्ष ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here