यूपी निवडणूक : वर्षभर साखरेसह मोफत रेशन देण्याचे अखिलेश यादव यांचे आश्वासन

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये आमचे सरकार आल्यावर नागरिकांना वर्षभर मोफत दूध, साखर, तेल आणि तुपासह मोफत रेशन दिले जाईल अशी घोषणा समाजवादी पार्टीचे (सपा) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केले. अखिलेश म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून लोकांना मार्च महिन्यापर्यंत मोफत रेशन दिले जात आहे. मात्र आम्ही सत्तेवर आल्यानंतर लोकांना पूर्ण वर्षभर एक किलो तेल, तूप आणि दूध पावडरसह मोफत रेशन दिले जाईल.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करताना अखिलेश म्हणाले की, सपाची वाढती लोकप्रियता पाहून योगी बेचैन झाले आहेत. आम्ही गरिबांना ३०० युनिट वीज मोफत देऊ. तसेच औषधोपचार मोफत असतील. सध्या सुरू असलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीत ऊस उत्पादक शेतकरी महत्वाची भूमिका बजावत आहेत. तर राजकीय पक्षांनी त्यांना आकर्षित करण्यासाठी विविध घोषणा केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here