युपी : थकीत ऊस बिलांप्रश्नी शेतकऱ्यांची बैठक

बागपत : शहरातील कोटणा रोडवर सोमवारी किसान युनियनच्या बॅनरखाली एकत्र आलेल्या शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी उसाची थकबाकी न मिळाल्याबद्दल आणि कूपनलिकांचे वीज बिल माफ न झाल्याबद्दल शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, थंबा चौधरी आणि किसान युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ब्रजपाल चौधरी यांनी सांगितले की, घरगुती विजेचे दर वाढवण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची कूपनलिकेची बिले माफ करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र शेतकऱ्यांची बिले माफ केलेली नाहीत. उसाची थकबाकी वेळेवर दिली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. याबाबत लवकरात लवकर सरकारने लक्ष घालावे यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले.
यावेळी विक्रम आर्य, नरेश छपरौली, धीर सिंग, रामपाल सिंग, जितेंद्र तोमर, सतवीर सिंग, संजीव कुमार, श्याम सिंग आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here