युपी : थकीत ऊस बिलांप्रश्नी शेतकऱ्यांची बैठक, जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार

बुलंदशहर : थकीत ऊस बिले, मोकाट जनावरांकडून होणारी पिकांची नासधुस आणि विजेच्या समस्येबाबत भाकियूच्या (हरपाल गट) शिष्टमंडळाने लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. याबाबत आयोजित बैठकीमध्ये सरकार आणि प्रशासन शेतकरीविरोधी आहे, असा आरोप करण्यात आला.

याबाबत लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बुधवारी बीबीनगरमधील सहकारी संघाच्या कार्यालयात भाकियूच्या हरपाल गटाची मासिक बैठक झाली. मंडल अध्यक्ष प्रल्हाद सिंह यांनी सांगितले की, ऊस बिले थकीत असल्याने शेतकरी हवालदिल बनले आहेत. मात्र, त्यांच्या समस्या ऐकण्यास कोणीही तयार नाही. जिल्हाध्यक्ष कपिल सिरोही यांनी संघटनेच्या विस्ताराची मागणी केली. साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची ऊसाची बिले दीर्घ काळापासून थकीत असणे, मोकाट जनावरांकडून त्रास आणि विजेच्या समस्येबाबत कोणाकडूनही दिलासा मिळत नसल्याचे सांगितले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा निर्णय झाला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी उदयवीर सिंह होते. कपिल सिरोही यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी जयकरण सिंह, अतरसिंह, महेंद्र सिंह, उदयसिंह, नेपाल मलिक व गंगासरण फौजी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here