युपी : थकीत ऊस बिलाचा प्रश्न न सुटल्याने साखर कारखान्यासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन

बुढाना : थकीत ऊस बिलप्रश्नी भाकियूच्या कार्यकर्त्यांनी साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जे. बी. तोमर यांनी आंदोलक शेतकऱ्यांची, कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यांनी शेतकऱ्यांना ही समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. मात्र, भाकियूचे तालुकाध्यक्ष अनुज बालियान, विभाग अध्यक्ष संजीव पवार यांनी जोपर्यंत थकीत ऊस बिले मिळत नाहीत, तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवले जाईल.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन सुरूच ठेवले आहे. याची माहिती मिळताच कारखान्याचे उपाध्यक्ष जे. बी. तोमर यांनी आंदोलनस्थळी पोहोचून शेतकऱ्यांची भेट घेतली. आंदोलन मागे घेवून या प्रश्नातून तोडगा काढण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. जसजशी साखर विक्री होत आहे, तसतसे शेतकऱ्यांना ऊस बिले दिली जात आहेत, असे त्यांनी सांगितले. आंदोलन मागे घेण्याची विनंती त्यांनी केली. मात्र, शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

यावेळी आंदोलनस्थळी विकास त्यागी, इसरार, आशू राणा, प्रविंद्रन्द्र, नरेश, अबरार व राजबीर आदींसह भाकियूचे कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here