युपी: जादा ऊस उत्पादन घेणारे शेतकरी करणार राज्यभर मार्गदर्शन

लखनौ : कमी खर्चात जादा ऊस पिकाचे उत्पादन घेणारे शेतकरी आपल्या अनुभवांची देवाण-घेवाण आसपासच्या शेतकऱ्यांसोबत करणार आहेत. प्रगतिशील शेतकरी आसपासच्या गावांमध्ये शेतांवर जाऊन तेथे ऊस उत्पादनाच्या प्रगत तंत्राची माहिती देतील. याबाबत राज्यातील सर्व ऊस उपायुक्तांनी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना याबाबत निर्देश दिले आहेत.
राज्याचे साखर तथा ऊस आयुक्त संजय भुसरेड्डी यांनी सांगितले की, या गाठीभेटींच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना आपले अनुभव, विचार, त्यांनी वापरलेले तंत्रज्ञान मिळेल, असे नियोजन केले आहे. त्यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल. या अभियानाबद्दल भुसरेड्डी यांनी विभागातील सर्व अधिकाऱ्यांना निर्देश जारी केले आहेत.

teआपल्या कार्यक्षेत्रात जास्त ऊस उत्पादन करणारे प्रगतीशील तसेच ऊस उत्पादकता पुरस्कार मिळवणाऱ्या शेतकऱ्यांना घेवून छोट्या शेतकऱ्यांच्या गाठी-भेटी घेवून मार्गदर्शन करण्याची मोहिम राबवली जावी. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रती हेक्टर १२०० क्विंटल ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार करावी, असे निर्देश विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जादा ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तंत्राद्वारे युवा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे, असे राज्याचे साखर तथा ऊस आयुक्त भुसरेड्डी यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here