मुरादाबाद : उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यात सलग तीन दिवसांपर्यंत झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या शेतांमध्ये पावसाचे पाणी भरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतांचा दौरा केला असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.
मुरादाबादचे जिल्हा न्यायदंडाधिकारी मानवेंद्र सिंह यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, जर कोणी सर्वेक्षणात समाविष्ट नसेल तर त्यांनी नुकसान भरपाईसाठी अर्ज करावेत.
यादरम्यान जिल्ह्यातील अतिवृ्ष्टीमुळे पिकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एक शेतकरी पुष्पा यांनी सांगितले की, मी कर्ज घेवून पिकाचे उत्पादन घेतले. मात्र, पावसाने ते सर्व खराब झाले आहे. भाजी पूर्णपणे नष्ट झाली आहे. माझ्या शेतामध्ये पावसाचे पाणी भरले आहे.
आणखी शेक शेतकरी मुन्नी यांनी पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पावसाने माझ्या शेतातील पिक नष्ट झाले आहे. आता मी गुजराण कशावर करणार ? असा सवाल मुन्नी यांनी केला.