यूपी: अर्थमंत्र्यांनी केले मुख्यमंत्री योगींचे कौतुक, राज्य उद्गमशील बनविल्याचा दावा

78

लखनौ : उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच उत्तर प्रदेशात आता उद्योगांच्या गुंतवणूक संधी निर्माण झाल्या आहेत. यूपीमध्ये आम्ही डिफेन्स कॉरिडॉर बनवू इच्छित होतो. त्यातील अडथळे दूर करून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय योग्य ठरवला. आज उत्तर प्रदेश गुंतवणुकीसाठी एक चांगले राज्य म्हणून समोर आले आहे असे सीतारामण म्हणाल्या.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाचा मला अभिमान आहे. ते राष्ट्रासाठीच्या महत्त्वाच्या योजनांना प्राधान्य देतात. त्यांच्या अंमलबजावणीसाठी धोरण ठरवतात असे सीतारमण म्हणाल्या.

दरम्यान, मुख्यमंत्री योगी म्हणाले, राज्यात इंन्फ्रास्ट्रक्चर वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्यात राज्यात ५९४ किलोमीटरची गंगा एक्स्प्रेस वे राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा ठरेल. त्यामुळे लखनौ ते मेरठ हे अंतर फक्त पाच तासावर येईल. आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेचे काम पूर्ण झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
गेल्या साडेचार वर्षात राज्यात इन्फ्रास्ट्रक्चरचे अभूतपूर्व काम झाले आहे असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here