बागपत: उत्तर प्रदेश सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि त्यांना सुखी करण्यासाठी कार्यरत आहे. यापूर्वीच्या सरकारने साखर कारखाने बंद पाडण्यासह कारखान्यांची विक्री केली. मात्र, आता उत्तर प्रदेश सरकारने साखर कारखाने पुन्हा सुरू करून त्यामध्ये ऊस गाळप सुरू केले आहे. त्यामुळे साखर उत्पादनात उत्तर प्रदेश देशात अग्रेसर आहे असे प्रतिपादन ऊस मंत्री सुरेश राणा यांनी केले. सोमवारी साखर उद्योग आणि ऊस विकास विभागाचे मंत्री राणा यांनी सहकारी साखर कारखाना रमाला आणि बागपत येथे विश्रामगृहांचे व्हर्च्युअल लोकार्पण केले. यावेळी साखर उद्योग आणि ऊस विभागाचे राज्यमंत्री सुरेश पासी, ऊस तथा साखर उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी, साखर कारखाना संघाचे कार्यकारी संचालक विमल कुमार दुबे उपस्थित होते.
त्यांनी रमाला साखर कारखान्याचे मुख्य प्रबंधक डॉ.आर. बी. राम, बागपत साखर कारखान्याचे प्रबंधक आर. के. जैन यांना शेतकऱ्यांची बैठक व्यवस्था करणे, पिण्याच्या पाण्याची सोय, शेतकऱ्यांच्या समस्या ठराविक वेळेत सोडविणे याबाबत निर्देश देण्यात आले. यावेळी मुख्य ऊस अधिकारी अजय यादव, सुमित पवार, अनिल आर्य आदी कर्मचारी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link