शेतकऱ्यांना एका आठवड्यात ऊस बिले देण्याचे युपी सरकारचे प्रयत्न सुरू

लखनौ : राज्य सरकार हळूहळू साखर कारखान्यांकडून ऊस बिले एका आठवड्यात देण्याच्या दिशेने प्रयत्न करीत आहेत, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे ऊस विकास तथा साखर कारखाना मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी सांगितले. चौधरी यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, सध्या राज्यात १०५ साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १० दिवसात ऊस बिले देण्यात येत आहेत. ते म्हणाले की, याआधीच्या सरकारांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लवकर बिले देणे हे कठीण असल्याचे म्हटले जात होते. मात्र, सहा वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांना त्यांच्या ऊस बिलापोटी २.०४ लाख कोटी रुपये देण्यात आले आहे.

मंत्री चौधरी यांनी सांगितले की, या हंगामात ९३० कोटी टन उसाचे गाळप झाले आहे. या अंतर्गत ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांनानी २१,६२० कोटी रुपयांची ऊस बिले देण्यात आली आहेत. सद्यस्थितीत ९६ साखर कारखाने गाळप करीत आहेत आणि शेतकऱ्यांचा सर्व ऊस संपेपर्यंत गाळप सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्री चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, इथेनॉल उत्पादनात उत्तर प्रदेश राज्य देशात अव्वल आहे. आणि शेतकऱ्यांचे टॅक्टर इथेनॉलवर चालविण्याबाबत संशोधन सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here