युपी: निरीक्षकांनी घेतला ऊस सर्वेक्षणाचा आढावा

लखीमपूर खिरी : लखीमपूरमधील ॲडव्हांटेज ग्रुपच्या गोविंद शुगर मिलकडून ऐरा विभागात सुरू असलेल्या ऊस सर्वेक्षणाची पाहणी ऊस विकास निरीक्षकांनी केली. या तपासणीदरम्यान, शेतकऱ्यांकडून घोषणापत्र भरून घेण्यासह त्यांच्या अडचणी सोडविण्याच्या सूचना सर्व्हे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांनी तपासणी करणाऱ्या पथकाचे मदतीबद्दल आभार मानले.

दैनिक भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, धौरहरा विभागातील ॲडव्हांटेज ग्रुपच्या गोविंद शुगर मिलकडून सर्वेक्षणाच्या कामाला गती देण्यात आली आहे. ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक घनश्याम सिंह यांच्या उपस्थितीत बसहिया गावात ऊस पर्यवेक्षक राजदेव, ऐरा साखर कारखान्याचे पर्यवेक्षक शिवम सिंह, कारखान्याचे अधिकारी दिनेश सिंह, सहाय्यक ऊस महाव्यवस्थापक कपिल चौधरी यांनी तपासणी केली. शेतकऱ्यांना घोषणापत्राबद्दल माहिती देण्यात आली. कोणत्याही प्रकारच्या समस्या उद्भवल्यास शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, यासाठी अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर उपलब्ध करून देण्यात आले. शेतकऱ्यांनी विकास निरीक्षक घनश्याम सिंह यांच्यासह पथकाचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here