युपी: २० जूनपर्यंत ऊस सर्व्हे पूर्ण करण्याचे निर्देश

अमरोहा : हंगाम २०२३-२४ साठी ऊस सर्वेक्षण धोरण जाहीर करण्यात आले आहे. आणि हे काम २० जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात १४३ पथके सर्व्हे करीत आहेत. हे सर्वेक्षण हँड हेल्ड जीपीएसयुक्त कम्प्युटर मशीनद्वारे करण्यात येत आहे. शेतातच शेतकऱ्यांना ऊसाचे लागवड क्षेत्राची नोंद पावती दिली जात आहे. ऊस सर्व्हेसाठी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारावर ५०० ते १००० हेक्टरसाठी सर्कल तयार करण्यात आली आहेत.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, या ऊस सर्वेक्षण पथकात एक राजकीय ऊस पर्यवेक्षक व एक कर्मचारी असेल. त्यांना या कामाबाबतची मुलभूत माहिती असेल. विभागाच्या वेबसाइटवर शेतकऱ्यांना घोषणापत्र अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना हे घोषणापत्र भरणे अनिवार्य आहे. जे घोषणापत्र भरणात नाहीत, त्यांना ऊस तोडणी पावती दिली जाणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here