युपी: उसासह आंतरपिकांची कृषी संचालकांनी केली पाहणी

भावलखेडा : कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या ऊस विकास संचालनालयाचे संचालक डॉ. विरेंद्र सिंह यांनी कनेंग गावातील शेतकरी लालाराम यांच्या शेतातील एक हेक्टरमधील ऊस आणि मूग पिकाची पाहणी केली. राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशनच्या अंतर्गत विविध ठिकाणी आंतरपिकांची लागवड करण्यात आली आहे. येथे ऊसाच्या कोएल ९४१८४ या प्रजातीसह पुसा वैशाली या मुगाचे पिक घेण्यात आले आहे. त्यांची पाहणी करण्यात आली.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, दाऊदपूर गावातील शेतकरी बृजपाल सिंह यांच्या ०.३५६ हेक्टर क्षेत्रातील बियाणे प्लॉटमधील कोशा १४२३३ या प्रजातीच्या उसाची पाहणी करण्यात आली. जमालपूर गावातील महिला स्वयंसाह्यता गटाच्या अध्यक्षा अनिता देवी आणि इतर सदस्यांनी विकसित केलेल्या रोपवाटिकेची पाहणी करण्यात आली. याविषयी त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. जमालपूर गावातील शेतकरी अवनीश कुमार, बसुलीया गावातील शेतकरी राघवेंद्र यांच्या प्लॉटचीही पाहणी करण्यात आली. पाहणी दौऱ्यावेळी रोजा साखर कारखान्याचे ऊस विभागाचे सरव्यवस्थापक बृजेश शर्मा, ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक डॉ. सुनील कुमार कनौजिया, सर्वेश कुमार शर्मा, ऊस पर्यवेक्षक चंद्रशेखर, जगन्नाथ प्रसाद, राम रक्षा तिवारी आदींसह शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here