उत्तर प्रदेश: ऊस थकबाकी लवकर देण्याचे मंत्री सुरेश राणा यांचे आदेश

142

साखर कारखान्यांवर गाळप हंगाम 2019-20 चे 13380 करोड रुपये इतकी थकबाकी देय आहे.ऊस विकास तसेच साखर उद्योग मंत्री सुरेश राणा यांनी अधिकार्‍यांना निर्देश दिले की, कारखान्यांवर दबाव टाकून शेतकर्‍यांचे पैसे त्यांना द्यावेत. ते गु़रुवारी अधिकार्‍यांसह मासिक बैठक़ीमध्ये बोलत होते.
त्यांनी बैठकीमध्ये सध्याच्या तसेच गेल्या गाळप हंगामातील ऊस थकबाकी, गाळप हगाम 2020-21 साठी ऊस सर्वे प्रगती, अनुशासनिक कार्यवाही आदी प्रलंबित प्रकरणे, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची देयके, तसेच विभागीय योजनांच्या प्रचार प्रसाराची समीक्षा केली. दरम्यान त्यांना महिती देण्यात आली की, सध्याचा गाळप हंगाम (2019-20) मध्ये 119 साखर कारखान्यांनी एकूण 35,800 करोड रुपयांचा ऊस खरेदी केला आहे आणि 15 जुलै पर्यंत शेतकर्‍योंचे 22,420 करोड रुपये इतकी थकबाकी देण्यात आली आहे.

याप्रकारे शेतकर्‍यांचे साखर कारखान्यांकडून 13,380 करोड रुपये इतके देय अजूनही बाकी आहे. अप्पर मुख्य सचिव भूसरेड्डी म्हणाले, ऊस थकबाकी बाबत दैनिक मॉनिटरींग केली जात आहे. जे साखर कारखाने थकबाकी भागवण्यात कसूर करत आहेत त्यांच्या विरोधात सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले गेले आहेत.

जिल्हा योजना वर्ष 2020-21 च्या अनुमोदित कार्य योजना तसेच बॉर्डर एरिया डेव्हलपमेंट कार्यक्रमांच्या प्रगतीवरही चर्चा झाली. विकास कार्यांच्या समीक्षेमध्ये टोळ प्रकरणाची स्थिती, ऊस सर्वे, गुर्‍हाळांची स्थापना, क्रय केंद्रांचे निरीक्षक तसेच त्यांच्या मध्ये होणार्‍या कार्यवाहीची सिथती आणि ऊस कृषक पुरस्कार योजना आणि सोशल मिडिया तसेच प्रसार प्रचार कार्यक्रमांचीही समीक्षा करण्यात आली.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here