योगींच्या नेतृत्वाखालील सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १.५ लाख कोटींची बिले दिली : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या १० वर्षात तुलनेने खूप जादा असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशच्या पश्चिम विभागात शेतकऱ्यांशी व्हर्च्युअल संवादातून जन चौपाल मध्ये बोलताना व्यक्त केले. गेल्या पाच वर्षात यूपी सरकारने १.५ लाख कोटी रुपयांची ऊस बिले दिली आहीत. विरोधी पक्षांनी सत्तेवर असताना काय केले हे शेतकऱ्यांनी विसरु नये असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रडवले होते. गेल्या पाच वर्षात सरकारने १.५ लाख कोटी रुपये दिले आहेत असे ते म्हणाले.

जन चौपालमध्ये पंतप्रधान मोदी यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ते खोटे बोलून भडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले, युपीच्या विकासासाठी समाजवादी पक्ष आणि त्यांच्या आघाडीतील घटक पक्षांना सत्तेबाहेर ठेवण्याची गरज आहे. गेल्या सरकारने आग्रा, मथुरा, बुंदशहर या शहरी भागात फक्त ८००० घरे बनवली होती. मात्र, योगी सरकारने या तीन जिल्ह्यात ८५,००० हून अधिक घरे बांधली आहेत असे त्यांनी सांगितले. यापूर्वी गृह मंत्री अमित शहा यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी शेतकऱ्यांना ऊस बिले मिळण्यास उशीर झाल्यास भाजपने संबंधितांविरोधात कारवाईचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here