बागपत: सहकारी ऊस विकास व सहकारी साखर कारखाना व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. समितीची स्थापना करण्यासाठी दहा एप्रिल रोजी पक्की मतदार यादी प्रकाशित केली जाईल. ११ मे रोजी कार्यकारी समिती सदस्यांची निवड करून १२ मे रोजी उपसभापती व सभापती पदासाठी निवडणूक होईल. बागपतमध्ये तीन साखर कारखाना समित्या व एक सहकारी ऊस विकास समिती आहे. यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, दहा एप्रिल रोजी मतदार यादी प्रकाशित झाल्यानंतर १२ एप्रिल रोजी यादीतील आक्षेपांची छाननी करून अंतिम यादी जारी केली जाईल. १८ एप्रिल रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप केल्यानंतर २१ एप्रिल रोजी मतदान केले जाईल. कार्यकारी समित्यांच्या निवडीसाठी २७ एप्रिल रोजी एका यादीचे प्रकाशन होईल. एक मे रोजी आक्षेपांची छाननी करून ती अंतिम यादी प्रकाशित केली जाईल. जिल्ह्यातील एका ऊस विकास समिती आणि तीन कारखाना समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यात बागपत शुगर मिल, मलकपुर शुगर मिल आणि रमाला शुगर मिलचा समावेश आहे. बागपत ऊस विकास समितीची प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याची माहिती सहकार उपनिबंधक मोहसीन जमील यांनी दिली.