यूपी : गंगेच्या पाणीपातळीत गतीने वाढ, पुराचा अलर्ट जारी, अधिकाऱ्यांकडून पाहणी

54

कानपूर : कानपूरमध्ये गंगा नदीची पाणीपातळी गतीने वाढली आहे. नरौरा धरणातून गंगा नदीत दोन लाख क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहेत. नरोरातून पाणी सोडण्यात आल्यानंतर कानपूर गंगा बेराजमधूनही पाणी सोडले आहे. त्यामुळे गंगा बरेजचे सर्व ३० दरवाजे उघडण्यात आले आहेत. सातत्याने पाणी पातळी वाढत असल्याने गंगा नदीला पूर आला आहे. कानपूरमध्ये नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. मात्र, धोका पातळीच्या थोड्या खालून नदी वाहत आहे.

रविवारी कानपूरमधून अडीच लाख क्यूसेकहून अधिक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे अनेक जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नरोरो आणि हरिद्वारमधून पाणी सोडण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. परिणामी आज सकाळी आठ वाजता दोन्ही ठिकाणांहून २ लाख क्यूसेक पाणी सोडण्यात आले. ते सायंकाळपर्यंत कानपूरमध्ये पोहोचेल. प्रशासनाने पूरग्रस्त भागाची पाहणी केली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्यास सांगितले आहे. काही ठिकाणची भाजीपाला पिके कापून त्याची विक्री करावी असे सांगण्यात आले आहे.

नरोरातून पाणी सोडण्यानंतर उप जिल्हाधिकारी गजेंद्र सिंह, गौरव कुमार यांनी कासीमपूर, बक्शीपुरवा गावांची पाहणी केली. पुरामुळे महादेवी घाट, पोलीस लाइन, ज्युनिअर हायस्कूल भिम्मापूर्वा, कटरी अमीनाबाद, पूर्व माध्यमिक विद्यालय जलालपुर कटरी बांगर, प्राथमिक विद्यालय क्षेमकली देवी, गुगरापूर आदी ठिकाणी स्थलांतराची सोय करण्यात आली आहे. कटरी गंगपूर, कटरी कासिमपूर, कन्नौज कछोहा, दरियापूर चंदई, सलेमपूर रमई आदी ठिकाणच्या ग्रामस्थांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here