सहारनपूर : ऊस पिकावर टॉप बोरर किडीचा फैलाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता नव्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. या किडीचा फैलाव प्राथमिक टप्प्यात असून त्यामुळे यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले जावू शकतात असे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ऊस शेती केली जाते. गेल्यावर्षी १.२१ लाख हेक्टरमध्ये ऊस पिक घेण्यात आले होते असे विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले. यंदा या लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या ऊस विभागाकडून सर्व्हे सुरू आहे. त्याची मुदत १५ जूनपर्यंत आहे. यादरम्यान, काही ठिकाणी टॉप बोरर किड रोगाचा फैलाव झाल्याचे दिसून आले आहे. शेतकऱ्यांना आता त्याची चिंता सतावत आहे.
याबाबत कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी डॉ. आर. रे. कुशवाहा यांनी सांगितले की, या किडीमुळे ऊसाचा शेंड्याकडील भाग वाळतो. यासोबतच मुळे कमकुवत होतात. या रोगामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. यावर ट्रायकोग्रामा कार्ड प्रती दोन एकर लावावीत. थाईमोथाकसम एक किलो प्रती एकर टाकून कीड नियंक्षणात आणण्याचा उपाय शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन त्यांनी केले.