उत्तर प्रदेशातील साखर कारखाने इतर राज्यांना कोरोनाशी लढण्यात करत आहेत सहकार्य

लखनऊ: कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी साखर कारखान्यांचे योगदान दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनापासून लढण्यासाठी हॅन्ड सॅनिटायजर खूप महत्वपूर्ण आहे. आणि उत्तर प्रदेश हे निश्‍चित करत आहे की, त्यांच्या राज्याशिवाय इतर राज्यांनाही अधिकाधिक सॅनिटायजर उपलब्ध व्हावे, जेणेकरुन सारा देश मिळून कोरोनाला हरवू शकेल.

उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनी एकूण 36 लाख लीटर सॅनिटायजर च्या उत्पादनाचा 40 टक्के भाग देशाच्या दुसर्‍या राज्यांना दिला आहे. कोरोनाच्या फैलावाला रोखण्यासाठी या वेळी देशाच्या दुसर्‍या राज्यांनाही आज सॅनिटायजर ची खूप गरज आहे. उत्तर प्रदेशातील साखर कारखाने इतर राज्यांना कोरोनाशी लढण्यात मदत करत आहेत.

राज्याचे प्रमुख सचिव (आबकारी) संजय भूसरेड्डी यांनी सांगितले की, राज्याच्या डिस्टलरीज ने यावेळी एकूण 36 लाख लीटर सॅनिटायजरचे उत्पादन केले आहे. ज्यामधून 14.50 लाख लीटर सॅनिटायजर ला दिल्ली, महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, तामिलनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश, बिहार, असम, ओडिसा, राजस्थान, मेघालय, केरल, झारखंड, चंदीगढ, छत्तीसगड, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, तेलंगाणा, पश्‍चिम बंगाल, नागालैंड आणि दादरा नगर हवेेली पाठवण्यात आले.

उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांमध्ये प्रत्येक दिवसाचे सॅनिटायजर उत्पादन करण्याची क्षमता वाढवून आता दोन लाख लीटर प्रति दिन केले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक सॅनिटायजर उत्पादन करणार्‍या च्या साखर कारखान्यांची उत्पादन क्षमता मार्चमध्ये 40,000 लीटर प्रतिदिन होती, ते आता वाढवण्यात आली आहे, जेणेकरुन सॅनिटायजरच्या मागणीला पूर्ण केले जावू शकेल. याशिवाय, अनेक केमिकल यूनिट आणि साखर कारखान्यांनाही सॅनिटायजर च्या उत्पादनासाठी नवा प्लांट लावण्यासाठीही मंजूरी दिली गेली आहे.

ऊसाचे गाळप सत्र आता संपत आला आहे. साखर कारखाने सॅनिटायजर चे उत्पादन करत आहेत. गाळप हंगाम संपल्यानंतर इथे सॅनिटायजर उत्पादन सुरु राहू शकते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here