उत्तर प्रदेश : पाचट जाळणे रोखण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाले डीकंपोजर

पिलीभीत : उत्तर प्रदेश सरकारच्या ऊस विभागाने पिलीभीत येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शेतामध्ये पाचट जाळण्यापासून रोखण्यासाठी डी कंपोजरचे वितरण सुरू केले आहे.

याबाबत IANS मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, युपी काउन्सिल ऑफ शुगरकेन रिसर्च (युपीसीएसआर) आणि कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) च्या शास्त्रज्ञांनी पिकांचे अवशेष शास्त्रीय पद्धतीने डीकंपोज करण्याची पद्धती शेतकऱ्यांसमोर सादर केली आहे. जिल्हा ऊस अधिकारी जितेंद्र कुमार मिश्रा यांनी सांगितले की, विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याला डीकंपोजर मोफत उपलब्ध करून दिले आहे. यामुळे केवळ वायू प्रदूषण कमी होणार नाही, तर पर्यावरणाला पूरक इतर अनुकूल घटकही उपलब्ध होणार आहेत. पिलीभीतमधील केव्हीकेचे युनिट फिजियोलॉजिस्ट डॉ. शैलेंद्र सिंह ढाका यांनी सांगितलेकी, डीकंपोजरच्या वापरानंतर वाळलेले पाचट दहा ते बारा दिवसांत अन्नाच्या रुपात बदलते. यातून नायट्रोजन, पोटॅश, फॉस्फरस आणि इतर सूक्ष्म पोषक तत्वांचा भरपूर समावेश असतो. मातीच्या आरोग्यासाठी ही बाब खूप उपयुक्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here