युपी: नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने वाढणार ऊस उत्पादन

संभल : तालुक्यातील जिजौडा डांडा आणि सिरौर काजी या गावात रजपुरा येथील डीएमएम साखर कारखान्याच्यावतीने शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कृषी संशोधकांनी ऊस शेतीबाबतच्या नव्या तंत्रज्ञानाची माहिती दिली. ट्रेंच पद्धतीच्या माध्यमातून उसासोबत पूरक पिके घेऊन अधिक उत्पादन कसे मिळवता येईल याविषीय मार्गदर्शन केले.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, डीएमएम साखर कारखान्याच्यावतीने नव्या तंत्राने ऊस लागवड कशी करावी आणि उसातील पूरक पिकांचे उत्पादन कसे घ्यावे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी खास या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कृषी संशोधक डॉ. अवधेश डागर यांनी पोक्का बोईंग, लाल सड रोग यांसह इतर किडींपासून पिकाचा बचाव कसा करावा याची माहिती दिली. साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रणधीर सिंह यांनी उसाच्या ०११८ या प्रजातीच्या वाणाचा लाल सड रोगापासून बचाव करण्यासाठी ट्रायकोडर्माचा वापर करावा असे सांगितले. याशिवाय, उसाच्या ०२३८, १५०२३, ०११८ आणि १४२०१ या प्रजातीची लागवड करावी असे सांगण्यात आले. यावेळी कारखान्याचे वरिष्ठ महाव्यवस्थापक एस. के. त्यागी, सीईओ अनंत पांडे, अक्षत कपूर, ब्रजपाल सिंह, अमित धामा आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here