लखनौ : राज्याचे साखर उद्योग तथा ऊस विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांनी शेतकऱ्यांना उसावरील किड रोगांपासून सावधिरी बाळगावी असा सल्ला देताना त्यावरील उपायांबाबत सूचना केल्या आहेत. एप्रिल महिन्यापासून ऊस पिकावर किडींचा प्रादुर्भाव सुरू होतो, यावेळी ऊसाचे पिक वाढीच्या अवस्थेत असते. या काळात शेतकऱ्यांनी किडींबाबत जागरूक राहून त्यांना रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात, जेणेकरून अधिक उत्पादन घेता येईल, असे ऊस विकास विभागाने म्हटले आहे.
दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, वाढीच्या अवस्थेत उसाची पाने व देठ मऊ असतात. त्यामुळे विविध प्रकारचे किटक त्याला नुकसान पोहोचवू शकतात. अशा काळात आपल्या पिकाची वारंवार पाहाणी करावी. किडींचा फैलाव आढळल्यास त्याच्या नियंत्रणासाठी त्वरीत उपाययोजना करावी असे ऊस विभागाच्या ॲडव्हायजरीमध्ये म्हटले आहे. शेतकऱ्यांनी प्रथम यांत्रिक पद्धतीचा वापर करावा. नंतर जैविक पद्धतीने किड नियंत्रण करावे आणि अखेरीस रासायनिक औषधांचा वापर करावा. एप्रील ते जून या तापमान वाढीच्या काळात किडीचा अधिक प्रसार होतो. उसाच्या खोडावर कीड पसरते. त्यातून पिक वाळते. त्यामुळे त्याचे यांत्रिक पद्धतीने नांगरट वगैरे करुन नियंत्रण करावे. बाधित ऊस रोपे काढून टाकावीत, पिकाला ठराविक कालावधीने पाणी द्यावे असे मार्गदर्शन ऊस विकास विभागाने केले आहे.