मेरठ : गळीत हंगाम २०२१-२२ मधील ऊस बिले देण्यात मेरठ विभागात अलिगढ कारखाना पहिल्या क्रमांकावर आहे. बुलंदशहर कारखाना ९६.५९ टक्के बिले देऊन द्वितीय तर मेरठ कारखाना ८६.३९ टक्के बिले देवून तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर बागपतचा मलकपूर कारखाना १६.७ टक्क्यांसह विभागात सर्वात पिछाडीवर आहे. विभागात १७ कारखाने आहेत. यापैकी मेरठ जिल्ह्यातील सहा कारखान्यांनी २६८२.११ कोटी रुपयांच्या उसाची खरेदी केली. ३० सप्टेंबरपर्यंत त्यांच्याकडून २३१७.२० कोटी रुपयांची ऊस बिले देण्यात आली आहेत.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस बिले देणाऱ्यांमध्ये मवाना, दौराला, नंगलामल आणि सकौती साखर कारखान्यांचा समावेश आहे. त्यांनी १०० टक्के बिले अदा केली आहेत. केवळ किनौनी आणि मोहिउद्दीनपूर या दोन कारखान्यांकडे सुमारे ३६५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. किनौनी कारखान्याने ५९७.९२ कोटी रुपयांचा ऊस खरेदी केला होता. त्यापैकी ३२६.९४ कोटी रुपयांची बिले देण्यात आली आहेत. कारखान्याकडे २७० कोटी रुपयांची थकबाकी आहे. मोहिउद्दीनपूर कारखान्याने २१४.०८ कोटी रुपयांचा ऊस खरेदी केली. त्यापैकी १२०.१५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर ९३.९४ कोटी रुपये थकीत आहेत.