युपी: पावसाने गव्हाचे पिक झाले उद्ध्वस्त

बुलंदशहर : गेल्या काही दिवसांत परिसरात जोरदार पाऊस झाला. रात्री झालेल्या अवकाळी पावसाने गहू आणि जवसाचे पिक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. शेतकऱ्यांना या नुकसानीची पाहणी करून सरकारने तातडीने मदत द्यावी अशी मागणी केली आहे.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकरी विनोद शर्मा यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्रीपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. जोरदार वाऱ्यासह हा पाऊस कोसळला. त्यामुळे गव्हाचे पिक शेतात भुईसपाट झाले. शेतकऱ्यांनी सांगितले की, वर्षभर शेती केल्यानंतर आता हे पिक कापणीची तयारी आम्ही केली होती. अशा काळात निसर्गाने पिक उद्ध्वस्त केले आहे. आठवडाभरापूर्वी अतिवृष्टी आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने नुकसान झालेल्या पिकापोटी आर्थिक मदत देण्याची गरज आहे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here