पंतप्रधान मोदी यांना शेतकर्‍यांच्या ऊस थकबाकी मुद्दयात हस्तक्षेप करण्याचा आग्रह

168

चंदीगढ: काँग्रेस चे राज्यसभेचे खासदार प्रताप सिंह बाजवा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंजाबमध्ये ऊस शेतकर्‍यांच्या ऊसाचे पैसे लवकर मिळावेत यासाठी हस्तक्षेप करण्याचा आग्रह केला. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी सांगितले की, पंजाबमधील साखर कारखान्यांना ऊस नियंत्रण आदेश, 1966, आणि ऊस खरेदी आणि पुरवठा विनियमन अधिनियम 1957 नुसार ऊस खरेदीच्या 14 दिवसांच्या आत कारखान्यांनी ऊसाचे पैसे देणे आवश्यकच आहे. पैसे भागवण्यात विलंब झाल्यानंतर त्यांना व्याजासहित पैसे भागवावे लागतील. पण हा कायदा असूनही शेतकर्‍यांना त्यांच्या थकबाकी साठी वर्षानुवर्षे प्रतिक्षा करावी लागते.

बाजवा यांनी सांगितले की, शेतकर्‍यांना त्यांचे पैसे वेळेवर मिळाले पाहिजेत. शेतकर्‍यांना आपल्या पैशांसाठी महिनोन महिने, प्रतिक्षा करावी लागते. अशा परिस्थितीत शेतकरी या जोखिमेबरोबर पीक उत्पादनात विविधता आणण्याचा प्रयत्न करु शकतील. याशिवाय, सरकारला राजकोषीय उपाय किंवा बजेटमधील तरतुदीवर लक्ष द्यावे लागेल, ज्यांचा उपयोग शेतकर्‍यांना त्यांचे पैसे भागवण्यासाठी केला जावू शकेल आणि कारखाना संचालकांकडूनही वसुली केली जावू शकेल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here