इथिओपियामध्ये साखर करात होवू शकते मोठी कपात

अदिस अबाबा, इथिओपिया : इथिओपियाने साखरेच्या उत्पादनावरील करात कपात करणे, तसेच ती 33 टक्क्यांहून कमी करुन 20 टक्के करण्याची योजना बनवली आहे. संसदेत सादर करण्यात आलेल्या मसुद्यानुसार, सरकारने देशाची अर्थव्यवस्था जागतिक बाजारात खुली करण्याच्या प्रक्रियेअंतर्गत साखर उद्योगाचे खाजगीकरण करण्याची योजना बनवली आहे. तसेच या अंतर्गत साखरेवरील उत्पादन कर कमी करण्याचा प्रस्ताव सादर केला आहेे.

याबाबत बोलताना एका व्यापार्‍याने सांगितले की, संसदेमध्ये सादर करण्यात आलेल्या प्रस्तावित कर कपातीमुळे घरगुती साखर उत्पादक आणि उपभोक्त्यांना दिलासा मिळेल, जो वर्षात 20 टक्के किमतीपेक्षाही अधिक गतीने वाढणार्‍या महागाईमुळे त्रस्त आहे.

प्रधानमंत्री अबी अहमद यांनी गेल्या वर्षी पदभार स्वीकारल्यानंतर देशात व्यापक आर्थिक आणि राजकीय सुधारणा केल्या, शिवाय अधिकाधिक विदेशी गुंतवणूकीला आकर्षित करण्यासाठी टेलीकॉम पासून लॉजिस्टिक पासून संपूर्ण सरकार नियंत्रित उद्योगांना जागतिक बाजारात खुले करण्याचे वचन दिले आहे.

याबाबत वित्त मंत्रालयाने सांगितले की, त्यांनी इथिओपिया च्या 13 साखर कारखान्यांचे नोव्हेंबरचे मूल्यांकन सुरु केले, जे डिसेंबरच्या शेवटपर्यंत पूर्ण होईल. सरकारने सांगितले की, खाजगीकरणाचा पहिला टप्पा वर्ष 2020 च्या पहिल्या तिमाहीत सुरु होईल, तसेच या दरम्यान सहा कारखान्यांची विक्री केली जाईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here