मालेगाव : भारतातील फूड, फार्मा क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या एम. बी. ग्रुपशी सलग्न मॅनिटॅब फार्मा स्पेशालिस्ट कंपनीशी जगभरात फूड व फार्मा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या अमेरिकेतील इनग्रेडीऑन कंपनीने गुंतवणूक केली आहे. जागतिक स्तरावरील उद्योग क्षेत्रात मॅनीटॅब फार्माचा यात समावेश झाला आहे. मॅनिटॅबमध्ये एम. बी. शुगरची प्रगती लक्षात घेत अमेरिकेतील इन्ग्रेडिऑन या फुड फार्मा क्षेत्रातील कंपनीने मॅभेटनिटॉल उत्पादनात आपली रुची दर्शवली होती. या पार्श्वभूमीवर एम. बी. शुगर व इनग्रेडीऑन कंपनीची संयुक्त घटक कंपनी करुन मॅनिटॅब स्पेशालिटीजची निर्मिती केली गेली. मॅनिटॅब कंपनीच्यावतीने मॅनीटॉल व इतर घटकांचे उत्पादन घेतले जाते. या संयुक्त कंपनी निर्मितीमध्ये एम. बी. शुगर्स चे संचालक ऋषभ, सौरभ व नेहा लोढा यांचा मोठा वाटा राहिला आहे .
दैनिक देशदुतमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, इनग्रेडीऑन कंपनीने मॅनी टॅब फार्मामध्ये गुंतवणूक केल्याने रोजगार निर्मितीस मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. गुंतवणूक प्रक्रियेनंतर इन्ग्रेडिऑनचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक जिम झॅली यांच्यासह आशिया पॅसिफिक प्रमुख वॉल्डरींन इव्हान्स, जागतिक संपर्क अधिकारी राणा कयाल, भारतातील प्रमुख अधिकारी प्रकाश कृष्णन, लेखाधिकारी मयंक गांधी यांनी मॅनिटॅब फार्माला भेट देत पाहणी केली. इन्ग्रेडियॉनच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे एम.बी. शुगरचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक विजयकुमार लोढा, तंत्र संचालक दिनेश कुमार लोढा, विपणन संचालक अनिल कुमार लोढा सम्यक लोढा, ऋषभ लोढा, सौरभ लोढा यांनी स्वागत केले. अध्यक्ष जिम झॅली यांनी भविष्यात एम बी ग्रुपबरोबर नवीन उत्पादनामध्ये एकत्र काम करण्यास इच्छुक असल्याचे सांगत भविष्यात मोठ्या गुंतवणुकीचे संकेत दिल्याची माहिती एमबी शुगरचे संचालक अनिलकुमार लोढा माहिती यांनी दिली.