इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्वीट ‘ऑल इज वेल‘

122

वॉशिंग्टन : इराण-अमेरिकेतील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. अमेरिकेने इराणचा टॉप कमांडर कासिम सुलेमानी याला ठार केल्यानंतर इराणने अमेरिकन दुतावासावर हल्ले केले होते. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास इराणने अमेरिकन लष्कराच्या दोन तळांवर क्षेपणास्त्रे डागली. इराकमध्ये असलेल्या दोन अमेरिकन लष्कराच्या तळांवर इराणने हा हल्ला केला आहे. इरबिल आणि अल असद या लष्करी तळांचा समावेश आहे. इराणने आता अमेरिकन लष्कराच्या तळांवर 12 बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात अमेरिकेचे 30 जवान मारले गेल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ’ऑल इज वेल’ असे म्हटले आहे.

या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ’ऑल इज वेल’ असे सांगत सगळं काही अलबेल असल्याचे ट्रम्प यांनी मत व्यक्त केले आहे. इराणकडून इराकमधील अमेरिकेच्या लष्करी हवाईतळांवर क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला आहे. इराणने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून अमेरिकेकडूनही वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.

’ऑल इज वेल! इराणकडून इराकमधील दोन लष्करी हवाई तळांवर हल्ला करण्यात आला आहे. जीवितहानी आणि नुकसानीची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत सगळं काही ठीक आहे. सध्या तरी आमच्याकडे जगातील सर्वात शक्तिशाली आणि सुसज्ज सैन्य आहे. उद्या सकाळी आम्ही यासंबंधी निवेदन जारी करु’असेही ट्रम्प यांनी जाहीर केले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here