अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया कोरोना पॉजिटिव्ह

163

कोरोनाने पूर्ण जगात हाकाहाकार माजवला आहे. याच्या विळख्यात करोडो लोक आलेले आहेत. आता जगातील सर्वात शक्तीशाली नेत्यांमधले एक अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प देखील कोरोनाग्रस्त आढळले आहेत. ट्रम्प यांनी याची महिती ट्वीटरवरुन दिली. टेस्ट रिझल्ट आल्यानंतर दोघांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे.

व्हाइट हाउस मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे खाजगी सल्लागार होप हिक्स देखील शुक्रवारी कोरोना पॉजिटिव्ह आढळले होते. ज्यानंतर ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीने कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला होता.

ट्रम्प यांनी ट्वीटर वर लिहिले आहे की, मी आणि मेलानिया कोरोनाग्रस्त आढळून आलो आहोत. आम्ही आमच्या क्वारंटाइन आणि रिकवरीची प्रक्रिया लगेचच सुरु करु. आम्ही दोघे मिळून याचा सामना करु.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here