अमेरिकेकडून साखर आयात कोट्याला पुन्हा मंजुरी

न्यूयॉर्क : पाकिस्तान, श्रीलंका आणि इतर देशांप्रमाणे अमेरिकेतही साखरेच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. साखरेच्या किमती कमी करण्यासाठी अमेरिकन सरकारने इतर देशांना कमी दरावरील साखर आयातीचा कोटा मंजूर करणार असल्याचे स्पष्ट केले. देशांतर्गत बाजारपेठेत साखर पुरवठ्याची हमी आणि भडकलेला साखरेचा दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

अमेरिकन देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचे वायदा बाजारातील दर गेल्या नऊ वर्षांतील उच्चांकी स्तरावर, ३६ सेंट प्रती पाऊंडवर पोहोचल्या. अमेरिका निर्यातदार देशांना ७६,५७१ टन साखरेला पुन्हा मंजुरी देत आहे. यामध्ये डोमिनीक संघराज्य, ब्राझीलसारख्या देशांना सर्वाधिक वाटा मिळत आहे.

अमेरिकेच्या कृषी विभागासोबत कोटा कमी करण्याच्या प्रक्रियेवर काम करणाऱ्या यूएस ट्रेड रिप्रेझेंटेटिव्हनी (यूएसटीआर) प्रसार माध्यमांना सांगितले की, त्यांनी कमी दराच्या साखर कोट्याला पुन्हा मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. यास टीएरक्यूच्या रुपात ओळखले जाते. मूळ परवानाधारकांसोबत चर्चेनंतर आणि सुरुवातीला त्यांना दिलेल्या ऑर्डरचा पुरवठा करण्यास ते सक्षम नसल्याने आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

साखर व्यापार आणि पुरवठादार जार्निको समुहातील विश्लेषक विन्सेट ओरुर्के यांनी सांगितले की, साखरेचे वाढते दर रोखण्याचा प्रयत्न युएसडीएकडून केला जात आहे. आयातीनंतर कच्च्या साखरेचा साठा वाढविण्यास मदत मिळेल. या उपायांनी अमेरिकेतील कच्च्या साखरेच्या किमतीतील वाढ रोखली जाण्याची अपेक्षा युएसडीएला आहे. युएसडीने मासिक पुरवठा आणि मागणीच्या अहवालाची पडताळणी सुरू केली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here