अमेरिका : फ्लोरिडा क्रिस्टल्स बनला खास सेंद्रीय साखरेचा पहिला आरओसी प्रमाणित ब्रँड

69

वेस्ट पाम बीच : सेंद्रीय पद्धतीने उगवलेल्या उसापासून तयार करण्यात आलेल्या Regenerative Organic Certified (आरओसी) साखरेचा ब्रँड बनण्याचा मान फ्लोरिडा क्रिस्टल्स कंपनीने मिळवला आहे. मातीच्या आरोग्यासाठी कार्बनच्या उच्च मानकांची पूर्तता करताना शेतीच्या तत्वांचे पालन करून सेंद्रीय ऊस विकसित करण्यात कंपनीने यश मिळवले आहे. कंपनीने आपल्या पुनरुत्पादक शेतीसाठीच्या प्रयत्नांतून सेंद्रिय प्रमाणीकरण मिळवले आहे. ते फ्लोरिडामधील तसेच युनायटेड स्टेट्समधील पहिले आरओसी केंद्र बनले आहे. मातीचे आरोग्य टिकविण्याकडे लक्ष देवून कंपनीने जगभरातील शेतीसाठी उच्च मानदंड प्रस्थापित केले आहेत.

निसर्गाशी सुसंगत शेती करताना अतुट बांधिलकी टिकवणे हे रिजनरेटिव्ह ऑरगॅनिक सर्टिफाइड (ROC) बनण्याचे यश आहे असे फ्लोरिडा क्रिस्टल्सच्या मार्केटिक विभागाच्या उपाध्यक्षा पॉला समर्स यांनी सांगितले. निसर्गाशी सुसंगत शेतीमध्ये आमची संस्था अधिक चांगले बनवण्याची ताकद देते. त्यातून हा पहिला सेंद्रीय साखरेचा घरगुती ब्रँड बनला आहे. कार्बन तटस्थता आणि मातीचे आरोग्य टिकवणे, पुनर्जन्मशील शेती हे फ्लोरिडा क्रिस्टलचे ध्येय आहे. मातीवरील इतर ताण कमी करून, कृत्रिम किटकनाशकांचा वापर न करता पिकवलेल्या उसाला प्राधान्य दिले जाते. जमिनीची पोषक तत्त्वे फ्लोरिडा क्रिस्टल नैसर्गिकरित्या भरण्याकडे लक्ष देते असे पॉला यांनी सांगितले. तर रिजनरेटिव्ह ऑरगॅनिक अलायन्सच्या कार्यकारी संचालक एलिझाबेथ व्हिटलो यांनी सांगितले की, कंपनी कारखान्यातील उप उत्पादनांचा सेंद्रीय खत बनविण्यासाठी वापर करते. स्वच्छ ऊर्जा निर्मितीत योगदान देते. नैसर्गिक वातावरणात उच्च दर्जाची साखर निर्मिती केली जाते, त्यामुळे हे यश मिळाले असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here