टोळांच्या हल्ल्याला रोखण्यासाठी ऊस विभागाकडून ड्रोन चा वापर

190

लखनऊ: उत्तर प्रदेश ऊस विकास विभाग पीलीभीत जिल्ह्यामध्ये कृषीक्षेत्रावर हल्ला करणार्‍या घातक टोळांचा पाठलाग करणे आणि त्यांना मारण्यासाठी ड्रोन चा वापर करत आहे. अतिरिक्त मुख्य सचिव संजय आर भूसरेड्डी म्हणाले, पूरनपुर ऊस समिती ने टोळांच्या हल्ल्याची तपासणी करण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच ड्रोन चा वापर करुन चांगले काम केले आहे.

भूसरेड्डी यांनी दावा केला की, ड्रोनचा वापर जटपुरा गावात केला गेला होता, जिथे शुक्रवारी टोळांवर कीटकनाशक फवारणी करण्यासाठी हे 10 लीटर कंटेनर घेऊन ड्रोन ला सोडले होते. ड्रोन च्या गोंधळाने मोठ्या संख्येने टोळ पळाले. आणि बाकी फवारणी करुन मारण्यात आले. ते म्हणाले,यापूर्वीच पीलीभीत आणि इतर जिल्ह्यामध्ये टोळांना मारण्यासाठी 1,000 लीटर कीटकनाशकांच्या मोठ्या टँकरचा वापर कृषी क्षेत्रांमध्ये केला जात होता. अतिरिक्त मुख्य सचिव भूसरेड्डी यांनी सांगितले की, सर्व विभाग राज्यातील विविध भागात टोळांचा हल्ला परतवून लावण्यासाठी समन्वयाने काम करत आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here