इथेनॉलचा वापर वाढणार

पेट्रोल वाढत्या दराचा परिणाम: कारखाना घ्यावे लागणारे परिश्रम

कोल्हापूर, 29 मे 2018: दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडत आहेत. या पार्श्वभूमीवर आता इथेनॉलला चांगले दिवस येतील अशी परिस्थिती आहे. देशात परदेशातून येणारे इंधनाची मागणी कमी करून इथेनॉल वापरावर भर दिला जाणार आहे. यामुळे पेट्रोल दर कमी करण्यास मदत होणार आहे. सध्या प्रति लिटर मध्ये 10% इथेनॉल मिसळण्याची मुभा आहे. यामध्ये आता वाढ केली जाणार आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

पेट्रोल मागणी आणि पुरवठा याचे प्रमाण साध्य करण्याकरिता इंधनात इथेनॉल मिसळणे हा एक चांगला पर्याय आहे.साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर पडायचे असेल तर साखर कारखान्यांकरिता इथेनॉल उत्पादन फायदेशीर ठरणार आहे.
याच पार्श्‍वभूमिवर पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिसळणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र सरकारने बंधनकारक केल्याने पेट्रोयिलम कंपन्यांकडूनही याची कडक अंमलबजावणी होत आहे. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांसह औषध, रसायनं तसेच मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडूनही इथेनॉलला मागणी वाढत आहे.

महाराष्ट्रात प्रति लिटर पेट्रोलचा दर 86 रुपयांपर्यंत पोचला आहे. दररोज पेट्रोल व डिझेलचे दर वाढत आहेत. या आठवड्यात तर इंधन दराने उच्चांक गाठला आहे.
जागतिक बाजारपेठेतही इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत हे दर खाली येतील असे म्हणणे धाडसाचे होणार आहे. भविष्यात याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहेत. भविष्यात इंधन दरातील चढ-उतार मोठ्या प्रमाणात होणार आहेत.

त्यामुळे महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी अध्यावत प्रकल्प राबवावे लागणार आहेत. कारण शुद्ध अल्कोहोल प्रकल्प…
पेट्रोलियम, रसायन तसेच मद्यनिर्मिती करणाऱ्या देशांतर्गत कंपन्यांकडून इथेनॉलची मागणी वाढत आहे. उत्तरप्रदेशातील साखर कारखान्यांकडून इथेनॉलची मागणी 40 टक्के पूर्ण केली जाते. महाराष्ट्रातील सुमारे 100 हून अधिक साखर कारखान्याने इथेनॉल निर्मिती करण्यात आघाडीवर आहेत. मात्र यामध्ये सातत्य नाही. इथेनॉल निर्मितीकडे लक्ष दिल्यास राज्यातील साखर उद्योगाला इथेनॉल विक्रीतून अंदाजे किमान सहा अब्ज रुपये मिळू शकतात. असे तज्ज्ञांचे मत आहे.

आज, इथेनॉलला प्रतिलिटर 41 रुपये पर्यन्त दर आहे. हा दर मिळाला तर इथेनॉल उत्पादन फायदेशीर ठरते. याकरिता लागणारे शंभर टक्के शुद्ध अल्कोहल अशा कंपन्यांना पुरविणे हा एक महत्त्वाचा सहप्रकल्प साखर कारखान्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो. महाराष्ट्रातून 50 कोटी हून अधिक लिटर इथेनॉल निर्मिती केली जात आहे. साखर कारखाने सध्या अल्कोहोलचीच विक्री करतात. पेट्रोलियम, मद्य, औषध आणि रसायन उद्योगाची प्रत्येकवर्षांची अल्कोहोलची गरज किमान 50 कोटी लिटरपेक्षा अधिक असून ती वाढत आहे. गेल्यावर्षी इथेनॉलचा दर 38 रूपये होता, यात केंद्र सरकारने वाढ केली असून सध्या 41 रूपये लिटर दराने इथेनॉल विक्री कारखान्यांकडून केली जात आहे. पेट्रोल दर वाढत राहिले तर येतील अशी मागणीही वाढेल. इथेनॉल मुळे साखर कारखाने आणि शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here