धान्य व्यवस्थापन तसेच गुणवत्ता नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने व्यवस्थापनात पारदर्शकता येते आणि मानवी हस्तक्षेप कमी राखता येतो असे प्रतिपादन केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग तसेच वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केले. लखनौ येथे भारतीय अन्न महामंडळाच्या उत्तर प्रदेश प्रभागातील व्यवस्थेचा आढावा घेताना ते बोलत होते .
भारतीय अन्न महामंडळाचे कामकाज अधिक कार्यक्षमतेने आणि आधुनिक होण्यासाठी आपल्या सूचना पाठवाव्यात असे आवाहन त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना केले . गोयल यांनी भारतीय अन्न महामंडळाच्या अधिकाऱ्यांना त्यांचे कौशल्य अन्न नियोजनाच्या क्षेत्रात वापरावे आणि मर्यादित जमिनीचा वापर करून मोठा क्षमतेची गोदामे उभारण्यासाठी अधिक चांगला आराखडा सुचवावा असेही सांगितले.
गहू तसेच धान खरेदीशी निगडित बाबींचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की भारतीय अन्न महामंडळाने उत्तर प्रदेशात सर्व महसूली जिल्ह्यांमध्ये अधिक खरेदी केंद्र उघडावीत. जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचे धान्य भारतीय अन्न महामंडळाला किंवा इतर एजन्सीना विकता येईल . उत्तर प्रदेशातील खरेदी केंद्रांवर वापरल्या जाणाऱ्या ई-पॉप मशीनचे त्यांनी कौतुक केले आणि इतर राज्यांमध्येही शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करताना कारभारात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी याचा वापर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
मागणी, लोकसंख्या आणि उत्तर प्रदेशचे मोठे भौगोलिक क्षेत्रफळ लक्षात घेता गव्हाचे खुल्या बाजारातील भाव नियंत्रणात आणण्यासाठी खुले बाजारपेठ विक्री योजनेत अधिक गहू पाठवावा असे आवाहन केंद्रिय मंत्र्यांनी केले
राज्याच्य साठवण क्षमतेचा आढावा घेताना गोयल यांनी अन्न महामंडळाची स्वतःची तसेच भाड्याने घेतलेली गोदामे आधुनिक दर्जाची असावीत अशी सूचना केली. महामंडळाने निम्न दर्जाची असलेली गोदामे दुरुस्तीची गरज असल्यास सुधारावीत अशी सूचना केंद्रीय मंत्र्यांनी केली .
(Source: PIB)