गेल्या अनेक दशकांपासून उपस्थिती असलेल्या युएस ग्रेन्स काउन्सिलने भारतात आपले कार्यालय सुरू केले आहे. नवी दिल्लीला या कार्यक्रमास यूएसजीसी काउन्सिलचे अध्यक्ष जोश मीलर, उपाध्यक्ष ब्रेंट बॉयडस्टन, सचिव तथा कोषाध्यक्ष वॅरीटी उलीबेरी, कॅन्सस कॉर्न कमिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग क्रिसेक यांच्यासह यूएसजीसीचे माजी अध्यक्ष चाड विलिस उपस्थित राहिले. “गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत राहिल्यानंतर भारतात आमचे आता स्वतःचे कार्यालय आहे. येथे पूर्णवेळ कर्मचारी असतील. अन्नधान्य आणि सह उत्पादनांच्या मागणीत भारताचे महत्त्व वाढत आहे, असे यूएसजीसीचे उपाध्यक्ष कॅरी सिफेरथ यांनी स्पष्ट केले. भारत हा आधीच यूएस इथेनॉलचा औद्योगिक वापरामध्ये सर्वोच्च ग्राहक आहे. आगामी काळात इथेनॉल आणि अन्नधान्याची अधिक मागणी राहील. त्यामुळे पूर्णवेळ कार्यालय ही भविष्यतील विकासाच्यादृष्टीने खूप महत्त्वाची बाब आहे,” असे ते म्हणाले. कार्यालयासाठी अतिरिक्त अनुदान दिल्याबद्दल त्यांनी कॅन्सस कॉर्न कमिशनला धन्यवाद दिले.
इथेनॉल प्रोड्युसर या बेवसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, यूएसजीसीने इथेनॉल आयातीसाठी प्रयत्न सुरू करण्यापूर्वी स्थानिक पशुधन खाद्य उद्योगासह भारतीय बाजारपेठेत काम केले आहे. इथेनॉल आणि डिस्टिलर्सची मागणी वाढवण्यासाठी, परिषदेने २०१८ पासून आपले नवे कार्यालय उघडण्याची प्रक्रिया सुरू केली होती. जुलै २०२२ मध्ये ती पूर्ण झाली आहे. यासाठी २०१९ मध्ये यूएसजीसीने भारतात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक कायदा फर्म नियुक्त केली असे यूएसजीसीच्या संचालिका अलेक्झांड्रा डॅनियलसन कॅस्टिलो यांनी सांगितले. भारत सरकारसोबत संपर्क, भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये बँक खाते उघडण्यासाठी नोंदणी आदी प्रक्रिया पूर्ण केली गेली. उद्घाटन समारंभाच्या व्यतिरिक्त काऊंन्सिलच्या या भारतीय कार्यालयाने १२ ते १८ जानेवारी या कालावधीत इंडिया ऑटो एक्स्पोमध्ये सहभाग घेतला. इथेनॉलमधील प्रमोशनचे प्रयत्न आणि ऑटोमोटिव्ह उद्योगात जैव इंधनाचे देशाला होणारे फायदे याची माहिती यामधून देण्यात आली. याच अनुषंगाने सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल असोसिएशनसोबत (SIAM) एका सामंजस्य करारावर (MOU) स्वाक्षरी करण्यात आली. या उद्योगासाठी इतका मोठा पाठिंबा मिळणे हे खूप मौल्यवान होते. आता या सामंजस्य कराराद्वारे काम सुरू झाले असल्याने इथेनॉलच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेला मिळू शकणारे फायदे अधोरेखित करण्यासाठी काम करता येईल असे डॅनियलसन-कॅस्टिलो यांनी सांगितले.