पेट्रोलऐवजी इथेनॉलच्या वापराने प्रती लिटर २० रुपयांची बचत : नितीन गडकरी

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. तर वाढत्या आयातीमुळे सरकारही हवालदिल झाले आहे. अशा स्थितीत गाड्यांमध्ये इथेनॉल अथवा अन्य पर्यायी इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, याचा वापर केल्यास प्रती लिटर २० रुपयांपर्यंत बचत होईल.

केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी ब्रिक्स नेटवर्क युनिव्हर्सिटीतील एका कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, ब्राझिल, कॅनडा आणि अमेरिकेतील ऑटोमोबाइल कंपन्या फ्लेक्सिबल-फ्युएल इंजिन बनवतात. यातून ग्राहकांना १०० टक्के पेट्रोल अथवा १०० टक्के बायो-इथेनॉलच्या वापराचा पर्याय मिळतो.

इथेनॉल इंधनाचा वापर खर्चात बचत करेल असे सांगून गडकरी म्हणाले, देशात पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे लोकांना फटका बसत आहे. त्यामुळे भारत इथेनॉल उत्पादन वाढत आहे. अलिकडेच सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाची मुदत २०३० पेक्षा घटवून २०२५ केली. सध्या देशात ८.५ टक्के इथेनॉल मिश्रण केले जाते.

मंत्री गडकरी म्हणाले, देशात इथेनॉल उत्पादन वाढवण्यावर लक्ष देण्याची गरज आहे. त्यातून इंधन आयात घटू शकते. आयातीच्या पर्यायासाठीच्या धोरणाची गरज आहे. भारत दरवर्षी ८ लाख कोटी रुपयांचे कच्चे तेल आयात करतो. पुढील ४-५ वर्षात हे दुप्पट होईल. सरकारसाठी ही चिंतेची बाब आहे. त्याचा अर्थव्यवस्थेवर फटका बसेल. त्यामुळे सरकार पुढील पाच वर्षात इथेनॉल अर्थव्यवस्था २ लाख कोटी रुपयांची बनविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

पेट्रोलऐवजी इथेनॉल वापराने २० रुपयंची बचत होईल. इथेनॉलची किंमत ६० – ६२ रुपये आहे. तर पेट्रोल १०० रुपयांवर आहे. एक लिटर इथेनॉल ७५०-८०० मिली पेट्रोलइतके असते. त्यामुळे या इंधनाने वीस रुपये प्रती लिटरची बचत होईल असे सांगण्यात आले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here