उत्तर प्रदेश: टोळ आक्रमणाबाबत आग्य्राचे शेतकरी सतर्क

आगरा: आग्य्राचे कृषी रक्षा अधिकारी यांनी राजस्थान शेजारील दौसा जिल्ह्यामध्ये पोचणार्‍या टोळधाडीच्या झुंड संदर्भात शेतकर्‍यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शेतकर्‍यांना सांगण्यात आले आहे की, टोळधाडीच्या आक्रमणाने घाबरण्याचे कारण नाही, पण सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. कारण हे कीटक आता सीमावर्ती क्षेत्रात पोचले आहेत.

शेतकर्‍यांसाठी टोळ आक्रमणाच्या प्रकरणामध्ये अधिकार्‍यांच्या रिपोर्टींगसाठी एक हेल्पलाइन नंबर 0522-2732063 जारी केला आहे. यापूर्वी, राज्यातील कृषी विभागाने राज्यातील पश्‍चिम भागात संभावित टोळ आक्रमणाच्या बाबत अलर्ट जारी केला होता. असे सूचित केले आहे की, पश्‍चिमी उत्तर प्रदेशातील जिल्हे सहारनपूर, मुजफ्फरनगर, शामली, मेरठ, बागपत, हापुड, मथुरा, आग्रा , गाजियाबाद आणि अलीगढ मध्ये टोळ आक्रमणाशी निपटण्यासाठी विशेष सतर्कता बाळगली गेल पाहिजे.

टोळ एकाचवेळी मोठ्या संख्येने आक्रमण करतात. आणि खूपच कमी वेळेत पीकाचे नुकसान करतात. यासाठी आक्रमणानंतर पीकाला वाचवणे कठीण असते. अशा स्थितीमध्ये पहिल्यापासूनच तयारी करुन हे आक्रमण थांबवले जावू शकते. कमी पाणी, दुष्काळ आणि उन्हाळ्यामध्ये टोळ अधिक सक्रीय होतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here