उत्तर प्रदेश: साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मितीचे आवाहन

लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील प्रत्येक ७५ जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन जनरेटर प्लान्ट सुरू करण्यासाठी राज्यातील १२० साखर कारखान्यांना आवाहन केले आहे. हवेतील ऑक्सिजन शोषून घेऊन हे ऑक्सिजन जनरेटर प्लान्ट त्याचे रुपांतर मेडिकल ऑक्सिजनमध्ये करतील. त्याचा सर्व जिल्ह्यांतील सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये (सीएचसी) पाईनलाईनमधून पुरवठा होईल.

प्रसार माध्यमांतील वृत्तानुसार, उत्तर प्रदेशच्या ऊस विकास आणि उत्पादन शुल्क विभागाचे सचिव संजय भूसरेड्डी यांनी प्रत्येक कारखान्याला ऑक्सिजन जनरेटर प्लान्ट सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. ५० बेडच्या सीएचसी अथवा जिल्हा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जाईल. राज्यातील सर्व ७५ जिल्ह्यांमध्ये कोविडच्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.

सचिव भूसरेड्डी म्हणाले, सद्यस्थितीत भारतात ऑक्सिजन जनरेटर मशीन उपलब्ध नाहीत. त्यामुळे आम्ही ती आयात करण्याचा प्रयत्न करीत आहोत. याशिवाय आम्ही पॉवर बॅकअपच्या मुद्याकडेही लक्ष देत आहोत. अनेक सीएचसीमध्ये तशी सुविधा नाही. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहोत. त्यातून अशा सीएचसी निवडता येतील. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील एका सीएचसीची निवड होईल. दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात दोन रुग्णालयांपर्यंत यात वाढ केली जाईल. राज्यात १२० साखर कारखाने आहेत. आम्ही सर्वांकडून ऑक्सिजन प्लान्टची अपेक्षा केली आहे.

सद्यस्थितीत ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता आहे. त्यामुळे सीएससी अथवा जिल्हा रुग्णालयांत ऑक्सिजन पाईपलाईन असणे गरजेचे आहे असे सचिव भूसरेड्डी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here