ऊस मूल्य वाढवण्यासह अनेक मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे निवेदन

145

बागपत : भारतीय शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी ऊसाची एफआरपी 450 रुपये क्विंटल करणे, तसेच ऊस थकबाकी भागवणे आणि डीजेल पेट्रोलच्या वाढवलेल्या किमती मागे घेण्याच्या मागण्यांचे 6 सूत्रीय निवेदन कलेक्ट्रेट प्रभारी यांना दिले. हे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे आहे. संघटनेने 15 दिवसांमध्ये या मागण्यांवर कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सोमवारी भारतीय शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले.

कार्यकत्यांंनी प्रभारी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संकटात जिथे उद्योग धंदे आणि वाहतुक बंद राहिली, तिथे शेतकरी सातत्याने फळ, भाजी आणि गहू कापून बाजारात पोचवून देशसेवा करीत आहे. तरीही शेतकर्‍यांना त्यांच्या मेहनतीचा पैसा मिळत नाही.

शिवाय सरकारने डीजेल आणि पेट्रोलचे दर वाढवून शेतकर्‍यांची कंबरच तोडली आहे. त्यांनी सरकारला शेतकर्‍यांच्या हितामध्ये ऊसाची एफआरपी 450 रुपये क्विंटल करुन ऊस थकबाकी व्याजासहीत द्यावी, पिकांच्या मूल्यात वाढ करावी, शेतकरी क्रेडीट कार्डाची मर्यादा 4 टक्के दराने 3 लाखाहून वाढवून 6 लाख करावी, डीजेल पेट्रोल च्या किंमती मागे घ्याव्यात, ़घरगुती तसेच ट्युबवेल च्या विजेचे बिल माफ करावे तसेच शेतकर्‍यांना कर्ज उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.

या मागण्यांवर जर 15 दिवसांमध्ये कारवाई केली गेली नाही तर शेतकरी संघटना रस्त्यावर उतरुन आंदोलन करेंल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी भारतीय शेतकरी संघटनेचें राष्ट्रीय उपाध्यक्ष अन्नु मलिक, जिल्हा सचिव विनोद उज्ज्वल, रवि, अंकित, कमल, नूर मोहम्मद, माशूक अली आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here